Murder : नगर : चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील अंगणवाडी सेविकेचा निर्घृण खून (Murder) करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने २४ तासांत गजाआड केले. सुभाष बंडू बर्डे (वय २५, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे.
‘संगमनेर तालुक्यात मी दहशत केली यांचं उदाहरण दाखवा’-बाळासाहेब थोरात
अंगणवाडीमध्ये आढळल्या वस्तू व रक्ताचे डाग
अंगणवाडी सेविका काल (ता. २४) सकाळी चिचोंडी पाटील येथील अंगणवाडीत गेली होती. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिच्या पतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिचा पती अंगणवाडीत गेला असता अंगणवाडीला कुलूप असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मात्र, संशय आल्याने त्याने अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडले. अंगणवाडीमध्ये त्याच्या पत्नीच्या वस्तू व रक्ताचे डाग दिसून आले. याबाबत त्याने नगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न व अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. तसेच अंगणवाडी सेविकेचा मृतदेहही पोलिसांना जवळच असलेल्या नदीत आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हाही दाखल करून घेतला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर बर्डे ताब्यात (Murder)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर सुभाष बर्डेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पथकाला सांगितले की, मयत अंगणवाडी सेविकेने सकाळी मुलीचे शालेय पोषण आहार नेण्यासाठी अंगणवाडीत बोलावले होते. त्यानुसार सुभाष अंगणवाडीत गेला होता. मात्र, त्यावेळी अंगणवाडी सेविका एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिचे डोके जोरात भिंतीवर अपटले. ती बेशुद्ध झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. सुभाषने तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जवळच असलेल्या नदीत फेकून दिला, असे सुभाषने पथकाला सांगितले. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.