Murder : नगर : श्रीरामपूर शहरात झालेल्या खुनाच्या (Murder) गुन्ह्यातील दोघा संशयित आरोपींच्या १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे.
नक्की वाचा: लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? – देवेंद्र फडणवीस
लोखंडी रॉड व चाकूने हल्ला
विजय गुलाब अडागळे (वय ३२, रा.वॉर्ड नं.६, श्रीरामपूर), तौफीक आयुब पठाण (वय २९, रा.वॉर्ड नं. १, श्रीरामपूर जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव आहे. याबाबत ज्ञानेश्वर हसे यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी (ता. ५) रात्री ८ वाजेच्या सुमारास कमलेश पवार व योगेश जगधने दारू पिऊन मित्राचे घरी बसले होते. त्यावेळी विजय गुलाब अडागळे याने कमलेश पवार यास फोन केला. त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर रात्री १२.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी व कमलेश पवार पुन्हा दारू विकत घेण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विजय अडागळे व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी आयकॉन कॉम्प्युटरच्या मागील कॉलनीत त्यांच्यावर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कमलेश पवारचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अवश्य वाचा: ‘बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा’-अजित पवार
सापळा रचून आरोपीला ताब्यात (Murder)
या घटनेचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषण व आसपासचे सीसीटीव्ही फुटेजवरून हा गुन्हा विजय अडागळे व तौफीक पठाण याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने श्रीरामपूर शहरातून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.