Murder : नगर : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा खून (Murder) केल्याचे उघड झाले आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला प्रवरासंगम येथे नदीपात्रात टाकून दिल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने तिघा संशयित आरोपीना (Accused) ताब्यात घेतले आहे. पंकज राजेंद्र मगर, (वय 35, रा.माधवनगर, तिसगाव, ता.पाथर्डी), इरशाद जब्बार शेख, (वय 38, रा.सोमठाणे रोड, तिसगाव, ता.पाथर्डी), अमोल गोरक्ष गारूडकर, (वय 33, रा.तिसगाव, ता.पाथर्डी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा: ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे
प्रवरासंगम येथे आढळला होता मृतदेह
याबाबत हकिगत अशी की, सोमवार (ता. ४) रोजी प्रवरासंगम ता.नेवासा येथे अनोळखी पुरूषाचा मृतदेह मिळून आला होता. मृतदेहाचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करून मृतदेहाची ओळख पटविली असता हा मृतदेह कल्याण देविदास मरकड, (रा.तिसगाव, ता.पाथर्डी) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मयत हे (ता.1) पासुन बेपत्ता असल्याने त्याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात मिसिंग असल्याची नोंद होती. मात्र कल्याण मरकड यांचा घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
अवश्य वाचा: ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Murder)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा पंकज मगर इरशाद शेख, अमोल गारूडकर यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी व मयत कल्याण देविदास मरकड असे तिसगाव मधील मिरी रोडच्या भारत पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस मोकळया जागेत दारू पित असताना मयत व पंकज मगर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले.वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन पंकज मगर याने त्याचेकडील गावठी कट्टयाने कल्याण मरकड याचे कपाळावर गोळी मारली. त्यात तो मयत झाला असल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर आरोपीतांनी मयताचा मृतदेह, चप्पल व मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका गोणीत भरून चारचाकी वाहनातुन प्रवरासंगम येथील ब्रीजवरून खाली पाण्यात टाकून दिला. तसेच आरोपी पंकज राजेंद्र मगर याने गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र हे सचिन रणसिंग रा.दत्ताचे शिंगवे ता.पाथर्डी याने पुरविले असल्याचे तपासात पुढे आले. ताब्यात घेतलेल्या आरोपीना नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.