Murder : तरुणाच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपीही जेरबंद 

Murder : तरुणाच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपीही जेरबंद 

0
Murder : तरुणाच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपीही जेरबंद 
Murder : तरुणाच्या खून प्रकरणातील दुसरा आरोपीही जेरबंद 

Murder : राहाता : दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली नाही म्हणून राहात्यातील ४२ वर्षाय तरूण गणेश कसाब याचा खून (Murder) करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला (Accused) राहाता पोलिसांनी (Police) सापळा रचून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. मंगळवारी (ता.५) रात्री नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात राहाता येथील गणेश भाऊसाहेब कसाब या तरुणाला मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती.

नक्की वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?

डोंगरगाव शिवारातून अटक

घटना घडल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व स्थानिक गुन्हा शखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्यातील आरोपी अनिल विश्वनाथ मोरे याला निफाड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात ताब्यात घेऊन अटक केली होती.

अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार

पोहेगाव शिवारात ताब्यात घेऊन अटक (Murder)

सदर आरोपींनी गुन्हा केला असल्याची कबुली देत दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली नाही म्हणून मी व माझा मित्र किरण रामदास वाघ असे आम्ही दोघांनी गणेश कसाब याचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर राहाता पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, श्रीरामपूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबरमे शिर्डी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरून या गुन्ह्यातील दुसरा आरोपी किरण रामदास वाघ याला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव शिवारात ताब्यात घेऊन अटक केली असून त्याने देखील हा गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या आरोपीला शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, किरण साळुंखे, बाबासाहेब काकड, सहायक फौजदार प्रभाकर शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल झिने , पंढोरे, अनारसे गोपीनय शाखेचे विनोद गंभीरे व आदी पोलीस कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.