Murder : नगर : चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोकसून खून (Murder) करणार्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी (Police) पुण्यातून ताब्यात घेतले होते. शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक (Arrest) केली असून रविवारी न्यायालयाने तीन दिवसाची बुधवार (ता.४) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
चेष्टा मस्करीत राग आल्याने भोसकले
जिशान रुस्तम अली खान, शमशुद्दीन निजामुद्दीन खान, रेहान अब्दुलहक शेख, फैजान सोहराबअली खान हे चौघे मित्र एकमेकांची चेष्टा मस्करी करत असताना शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास राग आल्याने त्याने मेडिकलमधील काऊंटरवरील कात्री घेऊन जिशान रुस्तम अली खान (वय १८, रा. घर नं. २३, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) यांच्या पाठीत भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा शनिवारी (ता. ३० नोव्हेंबर) रोजी सकाळी मृत्यू झाला.
अवश्य वाचा : निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती : कानडे
पुणे येथून पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात (Murder)
मुकुंदनगर भागात जिलानी मेडिकल जवळ शुक्रवारी (ता. २९ नोव्हेंबर) सायंकाळी ही घटना घडली होती. मयत जिशानचा भाऊ नसीबअली रुस्तम अली खान (वय २५ रा. घर नं. २३,शहाजीनगर, मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशुद्दीन निजामुद्दीन खान विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर शमशुद्दीन खान पसार झाला होता. तांत्रीक तपासाच्या आधारावर तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक शिंदे, संदीप घोडके, समीर शेख, प्रमोद लहारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.