Murder : नगर : श्रीगोंदा येथे दोन गटात फटाके वाजविण्याच्या झालेल्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून (Murder) करण्यात आला होता. या गुन्ह्यात (Crime) असलेल्या संशयित आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आवळल्या आहेत. त्याला सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातून येथून ताब्यात घेतले असून श्रीगोंदा पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे.
नक्की वाचा : अमेरिकेत आता तृतीयपंथींना मान्यता नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय
रस्त्यावर फटाके वाजविणे व दुचाकी जोरात चालविण्यावरून वाद
आतिक गुलामहुसेन कुरेशी, (वय ३८, रा.खाटीकगल्ली, श्रीगोंदा), असे आरोपीचे नाव आहे. ससाणेनगर श्रीगोंदा येथे २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन गटामध्ये रस्त्यावर फटाके वाजविणे व दुचाकी जोरात चालविणे या कारणावरून वाद झाला होता. या वादात जातीवाचक शिवीगाळ करून राम शंकर ससाणे, (वय ४८, रा.ससाणेनगर, श्रीगोंदा) यांना दगड, विटाने मारहाण करून गंभीर जखमी केले. यात उपचारादरम्यान राम शंकर ससाणे हे मयत झाले.
अवश्य वाचा : नवा जुना वाद मिटवून पक्षाचे काम करा: डाॅ. सुजय विखे पाटील
पथकाने सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Murder)
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी सोलापूर येथे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.