Murder : नगर : मिरजगाव (ता. कर्जत) येथे १० जानेवारी रोजी एका ३५-४० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पत्नीने प्रियकर व भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून (Murder) केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे बेवारस आढळलेल्या मृतदेहाचे कोडे उलगडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
तांत्रिक विश्लेषणातून हा गुन्हा उघड
संतोष शिवाजी काळे, (वय ४४, रा.पळसदेव, ता.इंदापूर, जि.पुणे), प्रविण प्रल्हाद जाधव (वय ३३, रा.सिंगर ता.डिग्रस, जि. यवतमाळ), ललिता दत्तात्रय राठोड, (वय २५, रा.जमशदपूर, ता.पुसद, जि. यवतमाळ), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या तिघांनाही मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणातून हा गुन्हा संशयित आरोपी संतोष काळे याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो इंदापूर, पुणे येथे असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ललिता दत्तात्रय राठोड, (ता.डिग्रस, जि.यवतमाळ) हिचे अवैध प्रेमसबंध होते. त्यांचेमधील प्रेमसबंधाला तिचा पती दत्तात्रय वामन राठोड, (रा.जमशेदपूर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) हा विरोध करत असल्याने त्यांनी ललिता राठोड हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव, रा.सिंगर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) यांनी मिळून गळा आवळून जीवे ठार मारले असल्याचे तपासात पुढे आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, विश्वास बेरड, हृदय घोडके, फुरकान शेख, रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे, रवींद्र घुंगासे, प्रमोद जाधव, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.
अवश्य वाचा : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे
दगडाने ठेचून चेहरा केला विद्रुप (Murder)
संतोष काळे हा बुधवार (ता. १) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ललिता दत्तात्रय राठोड हिला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी तिचा पती दत्तात्रय वामन राठोड तेथे आला. त्यांच्यात वाद होऊन दत्तात्रय राठोड यांनी पत्नी ललिता हिस मारहाण केली. त्यावेळी संतोष काळे, मयताची पत्नी हिचा भाऊ प्रवीण जाधव यांनी मिळून दत्तात्रय राठोड यास मारहाण करून त्याचा गळा दोरीने आवळून त्यास जीवे ठार मारले. दुसऱ्या दिवशी संतोष काळे याने त्याच्याकडील चार चाकी वाहनाने मृतदेह प्रवीण जाधव यांच्यामदतीने अहिल्यानगर जिल्ह्यातीळ मिरजगाव परिसरातील एका शेतातील खड्ड्यात टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणुन दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केल्यास तपासात समोर आले.