Murder : नगर : चाकूने खून (Murder) करणाऱ्या मयूर संजय भागवत या आरोपीस (Accused) दोषी धरून श्रीगोंदा येथील न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा (Penalty) सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदरचे खटल्याचे काम अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे यांनी पाहिले.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर
याबाबत हकीगत अशी की, (Murder)
आरोपी मयूर संजय भागवत हा फिर्यादी खंडू काशिनाथ चंदन (रा. कुंभार गल्ली कोळगाव), यांच्याकडे मूर्ती कारागीर म्हणून काम करत होता. मूर्तीचा कारखाना हा फिर्यादी यांच्या घरा नजीकच असल्याने सदर मूर्ती कारखाना शेजारी असलेल्या रूममध्येच राहत होता. ता. ३० मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी हा कारखाना येथे कामास आला. त्यावेळी ताराबाई यांनी तू कामावर उशिरा का आला, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. ताराबाई व तिचे पती हे कारखान्यामध्ये झोपले असताना रात्री साडेअकरा सुमारास मयूर संजय भागवत याने हातातील चाकूने वार करून ताराबाई जखमी केले. त्यानंतर ताराबाई यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यांन मृत्यू झाला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटलादरम्यान पैरवी अधिकारी सुजाता गायकवाड यांनी सहाय्य केले.