Murder : शेवगाव : तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव दहातोंडे (वय ७०) यांची क्रुरपणे हत्या (Murder) करण्यात आली. २६ जानेवारीपासून बेपत्ता (Missing) असलेले दहातोंडे यांचे मुंडके व धड वेगवेगळ्या विहिरीत आढळून आले.
अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री
दहातोंडे २६ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार
दहातोंडे हे या मंदिराची गेल्या १५ वर्षांपासून साफसफाई करीत होते. २६ जानेवारीपासून दहातोंडे बेपत्ता असल्याची तक्रार तेथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिसात दाखल केली होती. मंदिरा शेजारील विहिरीत ३० जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळेला वास येत होता. त्यामुळे तेथे पोलिसांनी पाहिले असता धड नसलेले मुंडके सडलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. मात्र, धड सापडत नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यावेळी मंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून दुर्गंध येत असल्याचे जाणवल्याने पोलिसांनी विहिरीत पाहिले. त्यांना विहिरीत पुरलेल्या अवस्थेत धड दिसून आले.
नक्की वाचा : मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
क्रूर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण (Murder)
पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी परिसरात पाहणी केली तर सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस या ठिकाणी तैनात होते. या क्रूर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही हत्या नेमकी कशामुळे झाली, याविषयी चर्चेला उधाण आले आहे.