Murder : नगर : बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मंदिरातील सेवेकरेच्या हत्येची (Murder) उकल शेवगाव पोलिसांनी केली आहे. मागील वर्षी मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्या प्रकरणी गुन्हा दाखल (Crime filed) केल्याचा राग मनात धरून पुजाऱ्याचे मुंडके धडापासून वेगळे करून खून केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ते वेगवेगळ्या विहिरीत टाकून दिले. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी (Police) एकास ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा : “भारतात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे”; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
विरोधात गुन्हा दाखल केल्याचा राग धरून हत्या
कैलास सुंदर काशिद असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे (वय ७१ रा. नागलवाडी) यांची हत्या झाल्याचे ३० जानेवारी रोजी उघड झाले. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे फिरवत पथके बोधेगाव, बालमटाकळी, भागात रवाना केली. तांत्रिक विश्लेषणातून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या कैलास काशीद याने केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मयत नामदेव रामा दहातोंडे यांनी त्याच्याविरुध्द पहिलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याच्या कारणावरुन आरोपी काशीद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग मनात धरून २६ जानेवारी रोजी पहाटे हत्या करुन मुंडके पहिलवान बाबा मंदीराच्या पाठीमागील विहिरीमध्ये टाकून दिले. तसेच धड दुसऱ्या विहिरीत पुरुन टाकले, असे तपासात पुढे आले.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकारचा मोठा निर्णय
कारवाईत सहभाग (Murder)
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, अशोक काटे, प्रवीण महाले, राजु ससाणे, नाना गर्जे, चंद्रकांत कुसारे, ईश्वर गर्जे, शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे, एकनाथ गर्कळ, संपत खेडकर, कृष्णा मोरे, राहुल आठरे, प्रियंका शिरसाठ, अमोल ढाळे, राहुल तिकोणे राहुल गुड्डू, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.