Murder : केडगावमधील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला कर्जतमधून अटक

Murder : केडगावमधील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला कर्जतमधून अटक

0
Murder : केडगावमधील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला कर्जतमधून अटक
Murder : केडगावमधील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला कर्जतमधून अटक

Murder : कर्जत : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून खून (Murder) झाला होता. या खून प्रकरणातील पसार आरोपीला कर्जत पोलिसांनी (Murder) आज (ता. २६) अटक केली. राजू दत्तू सुरवसे (वय २९, रा. माळीगल्ली, ता. कर्जत) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे.

नक्की वाचा : पुणे हादरलं!स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

प्रेयसीचा साडीने गळा आवळून खून

केडगाव येथे प्रेयसीचा साडीने गळा आवळून खून करून पसार झालेल्या राजूला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी (ता.२४) रात्री १०:३० च्या सुमारास मोहिनीनगर केडगाव देवी मंदिरामागे केडगाव येथे राजूने त्याची प्रेयसी संगीता नितीन जाधव (वय ३५, मूळ रा. पारगाव खंडाळा, जि. सातारा, हल्ली रा. मोहिनीनगर, केडगाव) हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा साडीने गळा आवळून खून केला होता. खुनानंतर तो लगेच पसार झाला होता.

अवश्य वाचा : राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असावे : बाळासाहेब थोरात

कर्जत गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई (Murder)

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी (ता.२६) दुपारी ३.३० च्या सुमारास कर्जतचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना बातमीदारामार्फत केडगाव खून प्रकरणातील पसार आरोपी राजू सुरवसे हा कर्जत शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. दौलतराव जाधव यांनी कर्जत गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी, पोलीस कर्मचारी प्रकाश दंदाडे, प्रताप देवकाते, किरण बोराडे यांना माहिती देत तत्काळ रवाना केले. 


कर्जत शहरात आरोपी सुरवसे यास सापळा रचत मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्याला तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे अंमलदारांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी, पोलीस कर्मचारी किरण बोराडे, प्रताप देवकाते, प्रकाश दंदाडे, दादाराम म्हस्के, होमगार्ड नामदेव नेवसे यांनी पार पाडली.