Murder : नगर : अपहृत तरुणाचा खून (Murder) करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारे आणखी पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांनी केकताई परिसर विळद घाट येथे नेऊन, मृतदेह लाकूड व डिझेलच्या साहाय्याने पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासता समोर आले आहे. याबाबत आरोपींना तोफखाना पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे.
नक्की वाचा : पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी
युवकाचा मृतदेह केकतायी परिसरात आढळला
अहिल्यानगर शहरामधील सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता परिसरातून २२ फेब्रुवारीला वैभव शिवाजी नायकवडे (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) या युवकाचे अपहरण झाले होते. या संदर्भात शुक्रवारी (ता. २८) नायकवडे कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, या युवकाचा मृतदेह केकतायी परिसरात रविवारी (ता. २) पोलिसांना आढळून आला. या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी अनिकेत विजय सोमवंशी (वय २३), सुमीत बाळासाहेब थोरात (वय २४), महेश मारुतीराव पाटील (वय २६) व नितीन अशोक ननवरे (वय २५, सर्व रा. नवनागापूर, ता. अहिल्यानगर) ताब्यात घेतले.
अवश्य वाचा : ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे
गुन्ह्यात आणखी पाच संशयित आरोपींचा समावेश (Murder)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात आणखी पाच संशयित आरोपींचा समावेश असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून विशाल दीपक कापरे (वय २२, रा.चेतना कॉलनी, नवनागापूर), विकास अशोक गव्हाणे (वय २३, रा.वडगाव गुप्ता), करण सुंदर शिंदे (वय २४ रा.शिवाजीनगर), रोहित बापुसाहेब गोसावी (वय २०, रा.गजानन कॉलनी), स्वप्नील रमाकांत पाटील (वय २३, रा.साईराजनगर, नवनागापूर) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता विशाल कापरे याने सांगितले की, आम्ही नऊ जणांनी मागील भांडणाच्या कारणावरून वैभव नायकोडी यास २२ फेब्रुवारी २०२५ रोजी तपोवन रोड परिसरातून कारमधून एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत व एका अपार्टमेंटमध्ये नेवून मारहाण करून त्यास जीवे मारले. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी २०२५ रोजी दुपारच्या वेळी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसर विळद घाट येथे नेऊन, मृतदेह लाकूड व डिझेलचा वापर करून पेटवून दिला असल्याचे तपासात पुढे आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रवींद्र घुंगासे, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.