Murder : नगर : नगर-पुणे महामार्गावरील चास (ता. अहिल्यानगर) शिवारात भोयरे पठार रस्त्यावर आढळलेल्या मृतदेहाचे (Dead Body) १५ दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचे (Murder) कोडे उलगडले आहे. याबाबत आग्रा येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याला तालुका पोलिसांच्या (Police) ताब्यात देण्यात आले आहे.
नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात
वैद्यकीय अहवालानंतर खून केल्याचे आले पुढे
खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर (रा.हॉटेल साईदरबार, सुपा टोल नाका, मुळ रा.बिजमाई ता.जि.आग्रा, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या १५ दिवसापूर्वी चास शिवारात एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर संबंधित व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचे तपासत पुढे आले.
अवश्य वाचा : बापरे! संपत्तीसाठी मुलीची स्वतःच्या आईला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
अनेक सीसीटीव्ही चेक करून संशयीत वाहन केले निष्पन्न (Murder)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पथकाने गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देऊन, अहिल्यानगर पुणे महामार्गावरील घटनास्थळाकडे येणारे-जाणारे रस्त्यांवरील ४० ते ५० हॉटेल, धाबे येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयीत वाहने निष्पन्न केले. मात्र, हे वाहन घटनास्थळापासून बेवारस आढळून आले. या वाहनांची चौकशी केली असता सुनिल बाबुराव काळे (रा.कुंभेफळ, संभाजीनगर) हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधुन मयत हा सुनिल बाबुराव काळे (रा.कुंभेफळ, ता.छत्रपती संभाजीनगर) हा असल्याची ओळख पटविली. त्यानंतर पथकाने मयत हा छत्रपती संभाजीनगर येथून हॉटेल स्वामी समर्थ, चास ता.अहिल्यानगर येथे आलेला असल्याने संभाजीनगर ते चास व चास ते सुपा टोलनाका येथील हॉटेल साई दरबार पर्यतच्या १७१ सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यानुसार तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा खुशालसिंग सत्यप्रकाश नाईठाकूर, (रा.हॉटेल साईदरबार, मुळ रा.बिजमाई ता.जि.आग्रा, उत्तर प्रदेश) याने केला असल्याचे तपासत समोर आले.
या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला आग्रा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, आरोपी व मयत दोघे एकत्र एका हॉटेल मध्ये दारू पिले. त्यानंतर मयत काळे याने राहण्यासाठी रूम बाबत विचारणा केली. त्यावेळी दोघे रूम पाहण्यासाठी दुचाकीवरून जात असताना काळे याने शिवी दिली. याचा राग आल्याने काळे याचा रुमालाने गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, फुरकान शेख, विश्वास बेरड, अरूण गांगुर्डे, सागर ससाणे, सागर मिसाळ, रोहित येमुल, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे व अरूण मोरे यांच्या पथकाने केली.