Murder : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरात मुंडके, दोन्ही हात, पाय धडावेगळे केलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. हा मृतदेह विहरीत टाकून खुनाचा (Murder) पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयीत आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा.दानेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
पथकाने अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली
याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्याचे मारुती केशव कोळपे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटना ठिकाणच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच जिल्हयातील व शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसींगची माहिती घेऊन, मृतदेहाचे फोटो व कानातील बाळी व मयताचे यापूर्वीचे फोटो यावरून पथकाने अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली. तपासात अनोळखी मृतदेह हा मयत माऊली सतीष गव्हाणे (वय १९, रा.दानेवाडी, पो.राजापूर, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) याचा असल्याचे निष्पन्न केले.
अवश्य वाचा : ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित;२१ मार्चला चित्रपट होणार प्रदर्शित
तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास (Murder)
रविवार (ता. १६) रोजी पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास करत असताना हा गुन्हा सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा.दानेवाडी, ता.श्रीगोंदा), याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. ही कारवाई गुन्हे शाखेतील तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरूण गांगुर्डे, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, जालिंदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, महादेव भांड यांच्या पथकाने केली.