Murder : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात खून (Murder) दरोडे, चोरीचे सत्र सुरु आहे. पुन्हा अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक बायपास परिसरात व्यापारी दीपक परदेशी यांचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. दहा कोटी रुपयांच्या मागणीसाठी व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेतील दोन संशयीत आरोपीना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका निलंबित (Suspended) पोलीस (Police) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सागर गिताराम मोरे (रा. ब्राह्मणी) व निलंबित पोलीस कर्मचारी किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
याबाबत माहिती अशी की,
दीपक लालासिंग परदेशी (वय ६८,रा. बोल्हेगाव), हे बेपत्ता होते. दीपक परदेशी २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले होते. या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनेचा तपास करत होते. यावेळी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार सागर मोरे व किरण कोळपे या दोघांवर पथकाला संशय आला. पथकाने दोन्ही संशयीत आरोपींना राहुरी परिसरातून ताब्यात घेतले.
नक्की वाचा : अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची उद्या घरवापसी
पैसे देण्यास नकार दिल्याने गळा आवळून खून (Murder)
आरोपींकडे अधिक तपास केला असता दीपक परदेशी यांचे विळद येथील लोकांकडे उसणे दिलेले पैसे अडकले होते. ते पैसे आपण काढून देऊ मात्र, गावातील लोकांकडे असलेले पैसे काढणे अवघड असल्याने दीपक परदेशी यालाच पैसे मागू असा प्लॅन ठरला. त्यानुसार परदेशी यांचे अपहरण करून त्यांच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, परदेशी यांनी नकार दिल्याने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपींनी निंबळक बायपास रस्त्याने विळद परिसरात मृतदेह फेकून दिल्याचे त्यांनी पोलीस पथकाला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजपुत, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अण्णा पवार, फुर्कान शेख, पोलीस सतीश शिरसाठ, दीपक जाधव, सुरज वाबळे, सुधीर खंदे यांच्या पथकाने केली.