Murder | प्रेम संबंधात अडसर; अपघाताचा बनाव करून पत्नीने केला पतीचा खून 

0
Murder :
Murder

Murder | पारनेर : अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करून पत्नीने खून (Murder) केल्याची घटना पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे घडली आहे. पारनेर पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याची उकल केली असून परप्रांतीय प्रियकर व मयताच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. रविवारी १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता निघोज ते पाबळ या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा अपघात होवून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पारनेर (Parner) पोलीस ठाण्यात मिळाली होती. 

नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार   

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन (Murder)

पोलीस तपासात मयत व्यक्ती ही पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथील बाबाजी शिवाजी गायखे असल्याचे समोर आले. त्यानंतर मयताचे अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये मयताचा मृत्यू हा अपघात नसून त्यास कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारल्याने अहवालातून समोर आले. पारनेर पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याची उकल केली.  

अवश्य वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण; ‘या’ मान्यवरांची वर्णी 

डोक्यात हत्यार मारुन खून (Murder)

मयताच्या पत्नीने अपघात झाल्याचा बनाव करून परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी मयताची पत्नी सुप्रिया बाबाजी गायखे हिला निघोज येथून तर २४ एप्रिल रोजी परप्रांतीय जनकभाई भुपतभाई भिडभिडीया या आरोपीस गुजरात मधून अटक केली. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवतात परप्रांतीय जनकभाई भिडभिडीया याच्या मदतीने अनैतिक प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरणारा बाबाजी गायखे याचा डोक्यात हत्यार मारुन खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. 

तसेच बाबाजीचा मृतदेह व मोटारसायकल निघोज ते पावळ रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव केला गेला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याची उकल करत आरोपींना जेरबंद केले. वरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, रणजित मारग, गहिनीनाथ यादव, गोर्वधन जेवरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here