Murder : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

Murder : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

0
Murder : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून
Murder : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

Murder : अकोले : प्रेयसीला भेटायला गेलेल्या युवकाला तिच्या नातेवाईकाने पाहिले व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारून टाकल्याची (Murder) घटना मंगळवारी (ता.५) पहाटे ५ वाजता पळसुंदे (ता. अकोले) येथे घडली. हा युवक नुकताच बारावीची परीक्षा (12th Exam) उत्तीर्ण झाला होता. याप्रकरणी अकोले पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक केली आहे.

नक्की वाचा : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय

महाविद्यालयात बारावीच्या वर्गात घेत होता शिक्षण

याबाबत मयत युवकाच्या वडिलांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचा मुलगा हा अकोलेतील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे पळसुंदे गावातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याची माहिती त्यांना दोन महिन्यांपूर्वी समजली होती. तेव्हा त्याला ‘तू शाळा शिक दुसरे कुटाणे करु नको’ असे समजावून सांगितले होते. त्यानंतर सोमवारी (ता.५) साखरपुडा व हळदीच्या कार्यक्रमासाठी नागमळा सातेवाडी येथे सर्वजण गेले होते.

अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन केली अटक (Murder)

कार्यक्रम संपल्यानंतर तो युवक रात्री ११.३० वाजता गाडीवर गेला. त्यानंतर तो मंगळवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीस भेटण्यास पळसुंदे येथे गेला. तिथे त्याला आरोपीने पाहिले व पकडून त्यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन त्याचा खून केला. यावरुन अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे करत आहेत.