Murder : पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी (ता.८) सकाळी उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय ७५) या वृद्ध महिलेची हत्या (Murder) करून, गुन्हेगाराने (Criminal) तिचा मृतदेह (Dead Body) घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ
श्वानपथकासह पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक नितीन दराडे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, हरीश भोये, पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले, अमोल बुचकुल, संभाजी कुसळकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवमन वाघ आणि त्यांची टीम, फॉरेन्सिक पथकाचे ठसे तज्ज्ञ रशीद शेख, श्वानपथकासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
अवश्य वाचा : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारताचा कसोटी कर्णधार
अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह (Murder)
घटनास्थळी तपास करत असताना, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे की, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला. विशेष बाब म्हणजे, घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या केवळ चोरीसाठी झाली नसल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील व पाथर्डी पोलीस करत आहेत.