Murder : नगर : युवकाच्या डोक्यात गोळी घालून ठार मारणाऱ्या (Murder) आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and session judge) अंजू शेंडे यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व ३० हजारांचा दंड सुनावला आहे. पोपट गणपत आदमने (रा. जवखेडा खालसा, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. जी. के. मुसळे यांनी काम पाहिले.
नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ
याबाबत हकीकत अशी की,
कामात शिंगवे येथील एकाचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला म्हणून या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पोपट आदमने याने २४ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादीच्या घरात घुसन त्याच्याजवळ असलेल्या बंदूकीने योगेश एकनाथ जाधव (वय २३) यांच्या डोक्यात गोळी मारून खून केला. यावेळी फिर्यादी एकनाथ जाधव व वसंत खाटीक, नंदा जाधव दीपा जाधव हे सोडविण्यास गेले असता त्यांना आरोपीने तलवारीने मारहाण केली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?
प्रत्यक्षदर्शी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या (Murder)
या गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण १७ साक्षीदाराच्या साक्ष नोंदविण्यात आली. खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारे तसेच जखमी फिर्यादी एकनाथ जाधव यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. ससून रुग्णालयाचे डॉ. जाधव, वैद्यकीय अहवाल व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयात आलेला पुरावा तसेच सरकारी वकील ॲड. जी. के. मुसळे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला दोषी धरून शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. मुसळे यांना ॲड. निखील मुसळे यांनी कामकाजामध्ये विशेष सहकार्य केले. तसेच पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी व पोलीस अण्णासाहेब चव्हाण, अरविंद भिंगारदिवे यांनी सहकार्य केले.