Murder : ‘त्या’ खुनाचा तपास लावा; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे

Murder : 'त्या' खुनाचा तपास लावा; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे

0
Murder : 'त्या' खुनाचा तपास लावा; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे
Murder : 'त्या' खुनाचा तपास लावा; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे

Murder : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी (Pimpalgaon Malvi) येथे भरदिवसा माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची हत्या (Murder) करण्यात आली होती. या घटनेला तब्बल तीन महिने उलटूनही अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. या गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) कार्यालयासमोर पिंपळगाव माळवी ग्रामस्थ तसेच शिवप्रहार (Shivprahar) संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी शिव प्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव, मंगल वाघ, जाई पवार, अश्विनी आढाव, सविता जाधव, कल्याणी रायकर, स्वाती गुंड, रेशमा पठाण, हिराबाई तरवडे, शितल वाघ, सविता बाबर, वैशाली वाय, ज्योती वाघ, वर्षा वाघ, वैशाली गुंड, वर्षा प्रभुणे, वंदना प्रभुणे, तलेजा बोरुडे, जय जाधव, सुजाता जाधव, सुरेखा प्रभुणे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर

१३ फेब्रुवारी रोजी दुपारी निर्घृण हत्या (Murder)

पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई कराळे यांची १३ फेब्रुवारी रोजी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला तीन महिने उलटून देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आदी उपस्थित होते.