Murder : मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी ताब्यात 

Murder : मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी ताब्यात 

0
Murder : मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी ताब्यात 
Murder : मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी ताब्यात 

Murder : नगर : पारनेर तालुक्यात बेवारस आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची (Dead Body) उकल करण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी (Police) या घटनेचा उलगडा केला असून मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून (Murder) केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

नक्की वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत

सुपा पोलिसांनी आरोपी घेतला ताब्यात

याबाबत सुपा पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला आहे. प्रदीप प्रभाकर शरणागत (वय २४, फुरसुंगी, पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर युनूस सत्तार शेख (वय ३६,  श्रीराम चौक, ससाणे नगर, हडपसर, पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

अवश्य वाचा : वाल्मिक कराडला करायची होती धनंजय मुंडेंच्या पीएची हत्या; विजयसिंह बांगर यांचा खुलासा

याबाबत माहिती अशी की, (Murder)

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण परिसरात १८ जून रोजी अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली होती. या घटनेचा तपास सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करत असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती हा पुणे येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मयताची ओळख पटविली. त्याच्या मित्राकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत पोलिसांना संशय आल्याने अधिक तपास केला असता प्रदीप शरणागत व मयत युनूस शेख यांचा एकत्रित फळविक्रीचा व्यवसाय असल्याचे समोर आले. त्यातूनच वाद झाल्याने प्रदीप शरणागत याने युनूस शेख यांच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. तसेच चार चाकी वाहनात टाकून त्याला नगर पुणे महामार्गावरील नारायण गव्हाण गावाच्या परिसरात असलेल्या कॅनॉल जवळ डिझेलच्या सह्याने पेटून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट, संजय कानगुडे, पोलीस अंमलदार कैलास इथापे, अमोल धामणे, अशोक मरकड, राहुल गोरे, योगेश सातपुते, विकास गायकवाड यांच्या पथकाने केली.