Murder : ‘त्या’ खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा; दोन आरोपी जेरबंद

Murder : 'त्या' खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा; दोन आरोपी जेरबंद

0
Murder : 'त्या' खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा; दोन आरोपी जेरबंद
Murder : 'त्या' खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा; दोन आरोपी जेरबंद

Murder : नगर : शेवगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात आढळून आलेल्या ‘त्या’ अनोळखी मृतदेहाची (Dead Body) ओळख पटवून खून (Murder) करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने बुलढाणा येथून जेरबंद केले आहे. हा खून प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहीरीत ढकलून आत्महत्या

चाकूने गळा कापून केला होता खून

सचिन पुंडलिक औताडे (वय ३२,रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छत्रपती संभाजीनगर), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, (कान्होबा), ता. खुलताबाद, जि. छ. संभाजीनगर), भारती रवींद्र दुबे (रा. फ्लॅट नं. 201, , एस. एस. मोबाईल शॉपी जवळ, कॅनॉट प्लेस सिडको, जि. छ. संभाजीनगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच त्याचा साथीदार अफरोज खान (पूर्ण नांव माहित नाही, रा. खटखट गेट, ता. जि. छ. संभाजीनगर) यास बोलावून घेऊन चाकूने गळा कापून खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

अवश्य वाचा : लग्नाळू युवकाची फसवणूक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी पसार

बुलढाणा येथे जाऊन आरोपींना घेतले ताब्यात (Murder)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव परिसरात गोदावरी नदी पात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा समांतर तपास करत हा गुन्हा दुर्गेश तिवारी, व भारती दुबे याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बुलढाणा येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. संशयितांकडे चौकशी केली असता प्रेमसंबंधातील वादाच्या कारणावरून खून केल्याचे तपासात समोर आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा अत्तार, प्रशांत राठोड, भगवान धुळे व सारिका दरेकर यांच्या पथकाने केली.