Murder : नगर : गेल्या काही दिवसापूर्वी किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत (Beating) एकजण गंभीर जखमी झाला होता. त्याचा पुणे येथे उपचारादरम्यन गुरुवारी (ता. २३) मृत्यू झाला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील
डोक्यात फरशी घालून जखमी (Murder)
कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत इंदिरानगर (अरणगाव रस्ता) येथील रवी निकाळजे व समीर शेख यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादात समीर शेख याने रवी निकाळजे यांच्या डोक्यात फरशी घालून जखमी केले होते. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमीला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रवी निकाळजे याचा मृत्यू झाला असून संबंधित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली आहे.
अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?



