Murder : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांच्या निर्घृण हत्येला (Murder) तब्बल आठ महिने उलटून गेले असले तरी अद्याप आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणातील तपास त्वरीत करून आरोपींना (Accused) अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या (Shiv Prahar Sanghatana) वतीने करण्यात आली आहे.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही
आझाद मैदान येथे उपोषण करण्याचा इशारा
अन्यथा मुबई येथील आझाद मैदान येथे पीडित कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. शिवप्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी लताबाई कराळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
आठ महिने उलटूनही आरोपींचा शोध लागला नाही (Murder)
घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दोन दिवसांत तपास उघड करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज आठ महिने उलटून गेले तरी आरोपींचा शोध लागला नाही. या निष्क्रिय तपासामुळे पिंपळगाव माळवी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



