Murder : नगर : कर्जत तालुक्यातील खांडवी परिसरात नाजूक कारणातून झालेल्या खुनाचा (Murder) उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने श्रीगोंदा येथून अटक केली आहे.
नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
मिरजगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
धनंजय राजेकर काळे (वय १९,रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी शुभम प्रल्हाद साळवे (वय २३, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचे वडिल प्रल्हाद सोनाजी साळवे (रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत), हे बुधवार (ता. १२) तहसील कार्यालय कर्जत येथे कामावर गेल्यानंतर दोन दिवस घरी आले नाही. १४ नोव्हेंबर रोजी प्रल्हाद साळवे यांचा खांडवी शिवारात मृतदेह आढळून आला. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुख्य आरोपी गुन्हा केल्यापासुन पसार होता (Murder)
या गुन्ह्यातील सांशयित आरोपी संध्या गोरख भोसले हिला अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून मुख्य आरोपी गुन्हा केल्यापासुन पसार झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार धनंजय काळे हा श्रीगोंदा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, ऱ्हदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, भिमराज खर्से, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.



