Murder : नगर : तीन महिन्यांच्या शिवांशचा त्याच्याच आई वडिलांनी गळा दाबून खून (Murder) केला. त्याच्या अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने या सर्व प्रकाराचा उलगडा केला असून, खून करणाऱ्या संशयित पोलिसांनी (Police) आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
संशयित व्यक्तींचे नावे (Murder)
ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. प्रकाश पंडित जाधव (वय.३७, रा. भिवपूर, ता. भोकरदन, जि. जालना), कविता प्रकाश जाधव (वय ३२), हरिदास गणेश राठोड (वय ३२, रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना), असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नावे आहेत.
अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे
याबाबत माहिती अशी की,(Murder)
गुरुवारी (ता.४) सकाळी आंबीखालसा येथील राहिवासीअशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीचे पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये एक अंदाजे ३ ते ४ महिने वय असलेल्या बालकाचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना हा घातपात असल्याचा संशय आला. त्यांनी या घटनेचा अधिक तपास केला असता मयत बालकाचे प्रेताची विल्हेवाट लावण्याकरीता वापरण्यात आलेली कार ही आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना या ठिकाणावरील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने भोकरदन येथे जाऊन आरोग्य केंद्र, आशा सेविका व गोपनिय माहितीचे आधारे माहिती काढली.
कविता प्रकाश जाधव हिचे नातेवाईकांनी त्यांचे बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेबाबत व त्यास ३ ते ४ दिवसांमध्ये रुग्नालयातून सोडणार असल्याची अफवा पसरविली असल्याची माहिती समजली. त्यानुसार पथकाने प्रकाश पंडित जाधव, कविता प्रकाश जाधव व हरिदास गणेश राठोड (सर्व रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना) यांना ताब्यात घेतले. शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव (वय. ३ महिने (रा. भिवपूर, ता. भोकरदन, जि. जालना) यास हरिदास गणेश राठोड याचेकडील चारचाकी वाहनातून बुधवार (ता. ३) रोजी पुणेचे दिशेने घेऊन जाऊन घारगाव ता. संगमनेर, जि.अहिल्यानगर) परिसरात एका नदीचे पुलाजवळ वाहन थांबवुन चालक व प्रकाश पंडित जाधव यांनी खाली उतरुन त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याचे कारणावरून बाळाचा गळा दाबून व त्याचे अंगावरील कपडे काढुन घेवुन त्यास नग्न अवस्थेत नदीचे पुलावरुन खाली फेकुन दिले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.



