Murder : नगर : कर्जत येथे १५ दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा (Murder) उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केला आहे. भाच्यानेच मामाचा खून केला असल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे.तेजस रामदास अनभुले (वय २१, रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अवश्य वाचा: कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल
खात्रीशीर माहितीनुसार कारवाई
याबाबत माहिती अशी की, हनुमंत गोरख घालमे (वय ३५, रा. भाळावस्ती, शिंदा ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे राहते घरी झापलेला असतांना (ता. ६) जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीने खून केला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा तेजस अनभुले याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
नक्की वाचा: आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप
आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत असल्याने खून (Murder)
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मयत मामा हनुमंत गोरख घालमे याचेवर बरेच कर्ज असल्याने तो वेळोवेळी पैशाची मागणी करत होता. त्यानुसार तेजस अनभुले व त्याचे आई वडिलांनी मयतास वेळोवेळी पैसे दिले. मात्र, मयत हनुमंत घालमे याने पुन्हा १० लाखांची मागणी केली. तेजस अनभुले याचे आई वडिलांनी मयतास पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मयताने आरोपी व त्याचे आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्या कारणावरून आरोपी याने मयताचे डोक्यामध्ये टणक वस्तुने मारुन त्याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याबाबत ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
हे देखील वाचा: बापरे!सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त,तर चांदीची २० हजार रुपयांनी घसरण



