Murder | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील एमआयडीसी परिसरातील विळदघाट बाह्यवळण चौकात बापूराव नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, सह्याद्री चौक, एमआयडीसी, अहिल्यानगर) या वृद्धाचा काल (ता. १५) खून (Murder) झाला होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सीसीटीव्ही व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या पालकांसमोर त्याची चौकशी केली असता त्याने बापूराव शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे समजते.
नक्की वाचा: इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा
केस कापण्यासाठी घरातून बाहेर पडले
बापूराव शिंदे हे केस कापण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, ते बराच वेळापासून परत आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांकडून शोध सुरू होता. त्याच वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, विळदघाट बाह्यवळण चौका जवळील एका रिकाम्या जागेत वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सापडलेला मृतदेह हा बापूराव शिंदे यांचा असल्याची खात्री करण्यासाठी कुटुंबियांना बोलावले. कुटुंबियांनी मतदेह ओळखला. त्यानुसार पोलीस पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे देण्यात आला.
अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
पालकांसमोर त्याची चौकशी
या खून प्रकरणाची जिल्हाभर चर्चा झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माणिक चौधरी यांना खुनाच तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माणिक चौधरींनी तपासासाठी पथक रवाना केले. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यानुसार बापूराव शिंदे यांच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पथकाने त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या पालकांसमोर त्याची चौकशी केली. त्यावेळी सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, पोलिसांनी एक-एक पुरावे समोर ठेवत त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, त्याने हा गुन्हा का केला? याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. पोलिसांच्या त्यादृष्टीने तपास सुरू आहे.



