Murder : सासऱ्याला संपविणाऱ्याने प्रेयसीलाही संपविल्याचे उघड; एका खुनाच्या तपासात उलगडली दुसऱ्या खुनाची कहाणी

Murder : सासऱ्याला संपविणाऱ्याने प्रेयसीलाही संपविल्याचे उघड; एका खुनाच्या तपासात, उलगडली दुसऱ्या खुनाची कहाणी

0
Murder : सासऱ्याला संपविणाऱ्याने प्रेयसीलाही संपविल्याचे उघड; एका खुनाच्या तपासात, उलगडली दुसऱ्या खुनाची कहाणी
Murder : सासऱ्याला संपविणाऱ्याने प्रेयसीलाही संपविल्याचे उघड; एका खुनाच्या तपासात, उलगडली दुसऱ्या खुनाची कहाणी

Murder : नगर : कर्जतमधील चिंचोली रमजान येथील आकाश गाढवे याने वडिल बापू आनंद गाढवे हे बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार करण्यात आली होती. स्थानीक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करतांना बापू गाढवे यांचा जावयाने सासरा त्याची जमीन विकू देत नसल्याने इतरांच्या मदतीने सासऱ्याची हत्या (Murder) केल्याचे उघड झाले आहे. पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीकडून आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी केली हाेती मिसिंगची तक्रार

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक मिसिंगची तक्रार येते. कर्जतमधील चिंचोली रमजान येथील आकाश गाढवे हा वडिल बापू आनंद गाढवे हे बेपत्ता असल्याची तक्रार करतो. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे या मिसिंगची चौकशी सुरू करतात. त्यासाठी एक पथक नेमले जातात.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

बापू गाढवे यांचा खूनात मुलगाही सहभागी (Murder)

पोलिस पथक नातेवाइकांकडे चौकशी करतात. त्या चौकशीत मृत व्यक्तीचा मुलावरच संशय निर्माण करतात. मिसिंगची तक्रार करणारा मुलगा आकाश बापू गाढवे यांच्याकडे पोलिस चौकशी करतात. त्यावेळी मृताचा जावई सुनील रामदास राठोड व इतर नातेवाइकांवर संशय व्यक्त केला. सुनील राठोड हा शेगाव येथे मित्र सचिन सारवानकडे राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिस पथक त्याचा शोध घेण्यासाठी शेगावमधील खळवाडी येथे गेले होते. त्यावेळी तो घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळू जात असताना जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.

बापू गाढवे यांचा खून जावई सुनील राठोड यांच्यासह मुलगा आकाश गाढवे, सुन पायल उर्फ आकांक्षा आकाश गाढवे, प्रथमेश उर्फ भावेश दिगंबर चांदूरकर, अमोल भिकाजी लाटकर या पाच जणांनी मिळून केल्याचे उघडकीस आले.

तोंडावर उशी ठेवून संपविले अन् घराजवळच जाळले
बापू आनंदा गाढवे यांची चिंचोली रमजान येथे शेतजमीन होती. ही जमीन नातेवाइकांना विकायची होती. परंतु बापू गाढवे हे शेतजमीन विक्री करण्यास नकार देत होते. त्यातून जावई, मुलगा, सून व इतर दोन नातेवाईकांनी चार जानेवारी रोजी दुपारी बापू गाढवे यांना संपविले. संपविले कसे तर राहत्या घरामध्ये बापू गाढवे यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचे तोंड दाबून व गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर घराजवळील लाकडी गोळा करून डिझेलच्या सह्याने प्रेत जाळून टाकत पुरावा नष्ट केला. जावई सुनील राठोड व मुलगा आकाश गाढवे याला पोलिसांनी अटक केली. इतर तिघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे.


सुनील राठोडने प्रियसीलाही संपविले

सुनील रामदास राठोड हा मूळचा अकोला जिल्ह्यातील आहे. तो काही दिवस पुण्यातील चाकण येथे राहत होता. त्याचे परभणी जिल्ह्यातील शितल लिंबाजी सोंगेवाड हिच्याशी प्रेमसंबंध होतो. तिने लग्नासाठी तगदा लावला होता. शितल ही त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. त्यावरून त्याने शितल हिला संपवून अकोला जिल्ह्यात तिचा मृतदेह जाळला होता, अशी कबुली सुनील रामदास राठोड याने दिलीय.