Murder : राहुरी परिसरात भर दिवसा युवकाचा खून ; राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Murder : राहुरी परिसरात भर दिवसा युवकाचा खून ; राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

0
Murder : राहुरी परिसरात भर दिवसा युवकाचा खून ; राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
Murder : राहुरी परिसरात भर दिवसा युवकाचा खून ; राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Murder : नगर : राहुरी शहरातील अभिनव सहकारी पतसंस्था परिसरात भरदिवसा घडलेल्या चाकू हल्ल्यात (Knife Attack) एका तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा उर्फ दादा शंकर कुलट (रा. वळण, ता. राहुरी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. उद्धव नंदलाल खुळे, किशोर दत्तात्रय खुळे, दोघे रा. वळण राहुरी), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना

याबाबत सोमनाथ शंकर कुलट यानी दिली फिर्याद

आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊ व कृष्णा कुलट हा घटनावेळी अभिनव सहकारी पतसंस्थेच्या समोरील आवारात बसलेला होता. त्यावेळी संशयित आरोपी तेथे आले आणि त्यांनी कृष्णा याच्याशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर आरोपीने आपल्या जवळील चाकूने कृष्णा यांच्या पोटात वार केला, तर किशोरने त्यांना ढकलून गंभीर जखमी केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कृष्णा यांचा जागीच मृत्यू(Murder)

जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक व डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी ५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.