Musical drama : नगर : स्नेहालय (Snehalaya) संस्थेच्या मानसग्राम प्रकल्प, मानसिक आरोग्य केंद्रास मदतीचा हात देण्यासाठी स्टेशन रस्त्यावरील आयकॉन पब्लिक स्कूल येथे 21 व 22 डिसेंबर या कालावधीत ‘भिंती बोलतात तेव्हा इतिहास ऐकू येतो’ या संगीत नाटकाचे (Musical drama) आयोजन करण्यात आले आहे. दोन सायंकाळी 5.30 वाजता हे नाटक होईल. या नाटिकेतून कदाचित आजपर्यंत माहिती नसलेल्या अनेक ऐतिहासिक कथा (historical fiction) अतिशय सुंदर मांडणीव्दारे सर्वांसमोर येणार आहेत.
हे देखील वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा
आयकॉन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा या संगीत नाटकात सहभाग आहे. त्यांनी आपल्या कलागुणांचा उपयोग समाजहितासाठी करण्यासाठी संगीत नाटक बसविले आहे. ऐतिहासिक घटनांचे कथाकथन, लाईव्ह सादरीकरण आणि ध्वनी, प्रकाश व्यवस्थेचा सुंदर मिलाफ या नाटकाचे वैशिष्ट्ये आहे.
नक्की वाचा : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा
नगरकरांसाठी हे नाटक इतिहासात डोकावण्याची संधी असून नव्यान आपला देदीप्यमान इतिहास यातून कळणार आहे. नाटक सर्व नगरकरांसाठी खुले असून पाल्यांसह पालकांना नाटकाचा आनंद घेता येईल. या नाटकासाठी प्रायोजकत्वही इच्छुकांना घेता येणार आहे. एका सामाजिक उपक्रमाला मदत आणि इतिहासाची माहिती अशी दुहेरी संकल्पना यातून प्रत्यक्षात उतरत आहे. जास्तीत जास्त नगरकरांनी या नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तिकिट विक्री आयकॉन पब्लिक स्कूल शाळेतील कार्यालयात सुरु आहे. प्रयोगाच्या दिवशीही शाळेच्या गेटवर तिकिटे उपलब्ध असतील.