Muslim Women’s March : नगर : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याबाबत अपशब्द व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम महिलांनी मोर्चा (Muslim Women’s March) काढत शुक्रवारी (ता.१९) जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) यांना निवेदन दिले. भर पावसात निघालेल्या या मोर्चात शहरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आपेक्षार्ह टिप्पणी
मुस्लिम महिला व मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आपेक्षार्ह टिप्पणी करुन समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राजेंद्र भंडारी यास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान कोठला येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. महिलांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे आय लव्ह मोहम्मद या नावाचे बॅनर झळकवून जोरदार घोषणाबाजी केली. निवेदनात म्हटले की, राजेंद्र भंडारी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरून अत्यंत गंभीर प्रकार केला आहे. त्याने मुस्लिम महिलांबादलही अपमानास्पद शब्द वापरले असून, त्यामुळे महिला वर्गाचा व समाजाचा अपमान झाला आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
अवश्य वाचा : शालेय विद्यार्थ्यांच्या आधार अपडेट प्रक्रियेत अडचणी; पालकांकडून ही होतेय मागणी
मुस्लिम महिला समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन (Muslim Women’s March)
सदरील प्रकरण गंभीर असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ राजेंद्र भंडारी यास अटक करावी. वारंवार मुस्लिम समाजाला संघटितपणे समाजकंटक टार्गेट करुन धार्मिक भावना दुखावत असून, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. तसेच अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी. जर या प्रकरणात त्वरीत कारवाई करण्यात आली नाही, तर समस्त मुस्लिम महिला समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.