Mylek Marathi Movie : आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

अभिनेत्री सोनाली खरेचा 'मायलेक' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिची लेकदेखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

0
Mylek Marathi Movie
Mylek Marathi Movie

नगर : मराठी मनोरंजन सृष्टीतील मराठमोळे स्टारकिड देखील रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहेत. अभिनेत्री सोनाली खरेचा (Sonali Khare) ‘मायलेक’ (Mylek) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिची लेकदेखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकतंच आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

नक्की वाचा : ‘ही अनोखी गाठ’ मधील ‘सखी माझे देहभान’ गाणे प्रदर्शित

प्रियंका तन्वरने केले ‘मायलेक’ या सिनेमाचे दिग्दर्शन (Mylek Marathi Movie)

प्रियंका तन्वरने ‘मायलेक’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मायलेक चित्रपटात काय ? (Mylek Marathi Movie)

आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, हे चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे.

चित्रपटाबद्दल निर्माती सोनाली खरे म्हणतात, ”आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आई मुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले.”

दिग्दर्शिका प्रियंका तन्वर म्हणतात,”हा विषय खूप संवेदनशील आहे. विशेषत: मुली जेव्हा वयात येतात. त्यावेळी आई आणि मुलीचे नाते खूपच नाजूक वळणावर असते. यात एकतर मुलगी आणि आई मैत्रिणी तरी होतात किंवा मग त्यांच्यात नकळत दुरावा तरी निर्माण होतो. मग अशा वेळी दोघीनींही एकमेकींना समजून घेणे गरजेचे आहे. विषय जरी नाजूक असला तरी खूप हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.

अवश्य वाचा : २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको; मराठा आंदोलनाची पुढची दिशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here