Google Aai Movie:मराठीत नवा प्रयोग;’गूगल आई’चा रहस्यमय टिझर प्रदर्शित

'गूगल आई' या नावावरूनच अनेकांना उत्सुकता लागून आहे. त्यातच आता ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक दमदार टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

0
Google Aai Movie:मराठीत नवा प्रयोग;'गूगल आई'चा रहस्यमय टिझर प्रदर्शित
Google Aai Movie:मराठीत नवा प्रयोग;'गूगल आई'चा रहस्यमय टिझर प्रदर्शित

नगर :गूगल आई'(Google Aai) या नावावरूनच अनेकांना उत्सुकता लागून आहे. त्यातच आता ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक दमदार टिझर सोशल मीडियावर शेअर (Teaser Relese) करण्यात आला आहे. डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले असून डॉलर्स दिवाकर रेड्डी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा टिझर अनेक रहस्यांनी भरलेला आहे.

नक्की वाचा : सामान्यांच्या खिशाला कात्री;भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ

गुगल आईच्या टीझरमध्ये नेमके काय ? (Google Aai Movie)

‘गुगल आई’ च्या प्रसारित करण्यात आलेल्या टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून ‘गूगल आई’ या कुटुंबाला कसे बाहेर काढते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. दरम्यान हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट आहे. या चित्रपटात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ होणार

२६ जुलैला चित्रपट होणार प्रदर्शित  (Google Aai Movie)

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, “एका लहान मुलीची ही कथा आहे. यातील कुटुंब हे एका मोठ्या संकटात सापडले आहे.  यातून गुगल आई आपल्या कुटुंबाला कसे बाहेर काढते. हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here