Nag Panchami : नागपंचमीनिमित्त महिलांनी धरला फेर

Nag Panchami : नागपंचमीनिमित्त महिलांनी धरला फेर

0
Nag Panchami

Nag Panchami : कर्जत : शहरातील शिक्षक वसाहतीमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर नागपंचमीनिम्मित परिसरातील महिलांनी फेर धरत पारंपारिक गाणे, झिम्मा आणि फुगडी खेळत मोठ्या उत्साहात नागपंचमीचा (Nag Panchami) सण (Festival) साजरा केला. यानिमित्ताने संस्कृतीचा (Culture) हा वारसा शहरात ग्रामीण भागाप्रमाणे दिसल्याने नवतरुणी देखील अवाक झाल्या होत्या.

Nag Panchami

नक्की वाचा: मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन

पारंपारिक गाण्यावर झिम्मा फुगडी

दिवसेंदिवस आधुनिक आणि पाश्चात्य संस्कृती अनुकरणात सण-उत्सवात महाराष्ट्रातील मातीची संस्कृती लोप पावू लागली आहे. आताच्या नवतरुणीना तर फेर, फुगडी, झिम्मा, काटवटखाना, सोंग तसेच पारंपरिक सण उत्सवात त्याला अनुसरून असणारी गाणे पाहायला आणि ऐकायला देखील मिळत नाही. याच अनुषंगाने कर्जत शहरातील शिक्षक वसाहतीमधील महिलांनी शुक्रवारी नागपंचमी सणानिम्मित विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर एकत्र येत फेर धरत पारंपारिक गाण्यावर झिम्मा फुगडी खेळत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. काळाच्या ओघात हरवत चाललेली जुनी पारंपरिक नागपंचमीची यानिमित्ताने परिसरात  मिळाली. यामध्ये सासुरवाशीनी आपल्या माहेराची ओढ, आपल्या माणसांचं कोडकौतुक त्याचबरोबर देवादिकांप्रती असलेला भक्तिभाव या गाण्यातून व्यक्त केला. दिवसभर घरगुती कामाने थकलेल्या माता-भगिनी यामध्ये उत्साहात सहभागी झाल्या होत्या. 

अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

वारसा जपायलाच हवा – स्वाती पाटील (Nag Panchami)

पूर्वी नागपंचमी सणाच्या काही दिवस अगोदर आणि नंतर महिला मोठ्या आनंदाने फेर धरीत झिम्मा, फुगडी, काटवटखाना, सोंग असे अनेक खेळ या निमित्ताने रंगायचे. थकल्या-भागल्या आया बाया अर्ध्या रात्रीपर्यंत अशा या फेर धरण्यामध्ये मनसोक्त रमून जायच्या. आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा आणि संस्कृतीचा हा वारसा आपण यासह पुढील पिढीने जपायला हवा. जेणेकरून त्यातील आत्मीयता, प्रेम आणि स्नेह वाढण्यास मदत होईल, असे मत कवयित्री स्वाती पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here