Nagar- Manmad Highway : नगर- मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल

Nagar- Manmad Highway : नगर- मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल

0
Nagar- Manmad Highway : नगर- मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल

काेड रेड…

Nagar- Manmad Highway : नगर : नगर-मनमाड रस्त्यावरील (Nagar- Manmad Highway) विळद बायपास ते पुणतांबा फाटापर्यंत अवजड वाहतूक (Heavy traffic) पर्यायी मार्गाने वळवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) राकेश ओला यांनी याबाबत नुकतेच आदेश काढले आहेत. ८ ते १७ सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी देखील वाहतूक (Transportation) पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आले आहेत.

नक्की वाचा: सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक

असा असणार पर्यायी मार्ग

नगर- मनमाड या महामार्गाचे दुरूस्तीच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरिता कल्याण बायपास चौक, नगर- कल्याण महामार्गावरून आळेफाटा, संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट, दूध डेअरी चौक, शेंडी बायपास, नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून कायगाव, गंगापूर, वैजापूर- येवला मार्गे इच्छित स्थळी जातील. 

अवश्य वाचा: सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव; केंद्र सरकारची घोषणा

पर्यायी मार्ग वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन (Nagar- Manmad Highway )

शनिशिंगणापूर-सोनई रस्त्यावरून मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून इच्छितस्थळी जातील. तसेच मनमाड, येवला, शिर्डीकडून नगर मार्गे पुणे-मुंबई कल्याणकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरिता मार्ग पुणतांबा फाटा, झगडे फाटा, सिन्नर- नांदूर शिंगोटे–संगमनेर, आळेफाटा मार्गे असेल. मनमाड- येवलाकडून नगर-सोलापूर-बीडकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरिता मार्ग- पुणतांबा फाटा येथून वैजापूर, गंगापूर कायगाव, प्रवरासंगम, शेंडी बायपास, विळद घाट केडगाव बायपास मार्गे असेल. लोणी-बाभळेश्वर-श्रीरामपूरकडून नगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर-श्रीरामपूर- टाकळीभान-नेवासा मार्गे- नगर अशी असणार आहे.