Nagar Pune Intercity Train : नगर : शहराचा विकास, बेरोजगारी, शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर-पुणे शटल इंटरसिटी रेल्वे (Nagar Pune Intercity Train) सुरु करण्याची मागणी शिवसेना युवा सेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), दिलदारसिंघ बीर, मुन्ना भिंगारदिवे, नरेश भालेराव, महेश शेळके, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न
शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी वारंवार सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी मागील १४ वर्षापासून ४० हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. सध्या दौंडमध्ये कॉर्ड लाईन, विद्युतीकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. शटल ट्रेनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. इतकेच नव्हे तर लहान तालुका असलेल्या दौडमधून पुण्यासाठी एक दैनंदिन शटल ट्रेन आहे. नगर हा एक प्रमुख स्थान असून भारतातील एक मोठे आर्मी बेस आहे.
अवश्य वाचा : बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
दररोज २० हजारहून अधिक प्रवाश्यांचा प्रवास (Ahmednagar Pune Intercity Train)
अहिल्यानगर व पुणे दरम्यान दररोज २० हजारहून अधिक प्रवासी प्रवास करतात, तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या ४० हजार पर्यंत पोहोचते. त्यामुळे अहिल्यानगर-पुणे दैनंदिन इंटरसिटी ट्रेनमुळे इंधन बचत, प्रदूषण आणि अपघात कमी होतील. दररोज २० हजार पेक्षा अधिक प्रवासी या सोयीचा लाभ घेतील. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल. रेल्वे प्रशासनाने आष्टी-नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.