Nagar Rising Half Marathon | नगर : महाराष्ट्रातील (Maharashtra) नावाजलेली व अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील प्रथम सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) या रनर्सच्या महाकुंभात आज (रविवारी) दोन हजार स्पर्धक उत्साहात सहभागी झाले. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, सूर्यकांत पारधी, विद्या उघाडे व स्नेहा गुर्जर यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात महेश रासकर, रिया मनियार, महादेव घुले व चैताली गांधी यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.
अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

या हाफ मॅरेथॉनमध्ये टाईमपास फेम प्रथमेश परब, सोनी मराठीवरील बहुचर्चित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील पृथ्वीक प्रताप आणि दत्तू मोरे हे आकर्षणाचे केंद्र ठरले. नगर रायझिंग फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण हास्य जत्रातील कलाकारांच्या उपस्थितीत जल्लोषात झाले. स्पर्धेत १० किलोमीटर व २१ किलोमीटर मॅरेथॉनला मेजर जनरल विक्रम वर्मा, आर्मड कोअर सेंटर अॅण्ड स्कूलचे कमांडन्ट ब्रिगेडियर अजय दलाल, एमआयआरसीचे ब्रिगेडियर रसेल डिसोझा, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी, तर ४ किलोमीटरच्या मॅरेथॉनला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनच्या आशाताई फिरोदिया, नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, नगर रायझिंगचे संचालक संदीप जाेशी, ‘साेहम ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, नगर रायझिंगचे ट्रस्टी डॉ. सतीश सोनवणे, डॉ. श्याम तारडे, अॅड. गौरव मिरीकर आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ४ किलोमीटर अशा तीन प्रकारांत झाली. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, चेस नंबर, भेट वस्तू व पदक देण्यात आले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. तर आय लव्ह नगर, सुहाना मसाले, बिगॉस, सी.टी. पंडोल अॅण्ड सन्स व बी.यू. भंडारी हे सह प्रायोजक होते. इंदू पॅव्हेलियन, हेमराज, चंगेडिया आउटडोअर्स, एमएमए मॅट्रिक्स जिम, सिनेलाईफ मल्टिप्लेक्स, हेल्थलेजर डाग्नॉस्टिक्स, अहमदनगर रिहॅब सेंटर, हायपरीस, एसपीजे स्पोर्टस क्लब, रेडिओ सिटी, अहमदनगर क्लब यांचे सहकार्य मिळाले. हेल्दी अफेअर्स, जय जलाराम फुड्स, बोरनील हे गुडी पार्टनर होते.

राजकीय व्यक्तीही धावले
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये घुले कुटुंबातील तीनही पिढ्यांनी धावण्याचा आनंद घेतला. यात नरेंद्र घुले, क्षितिज घुले व राजवीर घुले यांचा समावेश होता. नरेंद्र घुले व क्षितिज घुले हे १० किलोमीटरमध्ये तर राजवीर घुले यांनी ४ किलोमीटर प्रकारात सहभागी झाले होते. तर शिवसेनेच्या शिंदे गटात नुकतेच दाखल झालेले संभाजी कदम यांनी सहभाग घेतला.

दिव्यांगांनी वेधले लक्ष
मॅरेथॉनमध्ये सहभागी होत विषरुदा शेळके, अर्णव अवचर आदी दिव्यांगांनी आपणही इतरांपेक्षा कमी नसल्याचे सर्वांना दाखवून दिले. तर अंध खेळाडू तथा ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी अभियंता अमोल यनगंदुल व सचिन नराल यांच्या मदतीने १० किलोमीटरचे अंतरपूर्ण करत आली दृढ इच्छा शक्ती दाखवून दिली.

‘हे’ आहे स्पर्धेचे विजेते
२१ किलाेमीटर
युवक
प्रथम ः प्रेम काळे
द्वितीय ः भुषण भाटिया
तृतीय ः जालिंदर चेमटे
ज्येष्ठ
प्रथम ः सूर्यकांत पारधी
द्वितीय ः रवींद्र जाधव
तृतीय ः सुनील बनकर
ज्येष्ठ महिला
प्रथम ः स्नेहा गुर्जर
द्वितीय : स्मिता उकिरडे
तृतीय : निलम पंडित
युवती
प्रथम ः विद्या उघाडे
द्वितीय ः स्वप्नाली वामन
तृतीय ः रुपाली खंडेलवाल
१० किलाेमीटर
युवक
प्रथम ः महेश रासकर
द्वितीय ः अमरजित हिमाने
तृतीय ः विशाल शेळके
ज्येष्ठ
प्रथम : कर्नल (निवृत्त) महादेव घुगे
द्वितीय : बाजीराव
तृतीय: संजय शेळके
युवती
प्रथम ः रिया मनियार
द्वितीय ः तनुश्री वाबळे
तृतीय ः खुशबू गांधी
ज्येष्ठ महिला
प्रथम ः चैताली गांधी
द्वितीय ः सुनीता भिंगारदिवे
तृतीय ः सोनाली कासार