Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा जामीन अर्ज नामंजूर

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा जामीन अर्ज नामंजूर

0
Nagar Urban Bank
Nagar Urban Bank

Nagar Urban Bank : नगर : येथील ११० वर्षे जुनी नगर अर्बन बँकेत (Nagar Urban Bank) २५१ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांचा घोटाळा प्रकरणी अटक आरोपी संचालक अनिल चंदुलाल कोठारी (रा. माणिकनगर, नगर), संचालक अशोक माधवलाल कटारिया (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. नगर) व आरोपी तज्ज्ञ संचालक शंकर घनशामदास अंदानी (रा.भगत मळा, सावेडी, नगर) यांनी नगर जिल्हा न्यायालयात (District Court) जामीन अर्ज दाखल केले होते. या सर्व आरोपींचे (Accused) जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी नामंजूर केले आहेत.

Nagar Urban Bank
Nagar Urban Bank

नक्की वाचा: मी लोकसभा निवडणूक लढवावी ही जनमाणसाची भावना – नीलेश लंके

अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्र

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद २०१४ ते २०१९ या काळात हे आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्र, मिळकतीचे बनावट अहवाल इतर बनावट कागदपत्रे तसेच अनेक प्रकरणे मंजूर केली. या आरोपींचे खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे दिसून येत आहे. तसेच ऐपत नसताना अनेक कर्ज मंजूर केलेली दिसत आहे. या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अनेक कर्ज प्रकरणात आरोपीचा सहभाग दिसून येत आहे. यातील आरोपी हे संचालक असताना गैरव्यवहार केला आहे.

हे देखील वाचा :लोकसभा निवडणुकीची उद्या आचार संहिता जाहीर होणार

अर्बन बँकेचे अनेक संचालक फरार (Nagar Urban Bank)

तसेच तज्ज्ञ संचालक शंकर अदानी यांचे खात्यावर आठ लाख रुपये आल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात अर्बन बँकेचे अनेक संचालक फरार आहेत. तसेच अशोक कटारिया यांचे खात्यावर ४५ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सरकार पक्षाच्या युक्तिवादावर सदर अर्ज नामंजूर केले आहे. या जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके व मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. मूळ ठेविदारातर्फे अॅड. अच्युत पिंगळे वकिलांनी युक्तिवाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here