Nagar Urban Bank : संगमनेरमधून अमित पंडित यांना अटक; नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा प्रकरण

Nagar Urban Bank

0
Nagar Urban Bank

Nagar Urban Bank : संगमनेर : नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) 261 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची नाळ संगमनेर तालुक्यातील आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे खंदे समर्थक असलेले अमित पंडित याच्याशी जोडली गेल्याने संगमनेर शहर पोलिसांनी (Police) त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. घरात लपून बसलेल्या पंडितला अटक केल्यामुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली.

हे देखील वाचा : लाेकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; नगर जिल्ह्यात कधी होणार मतदान जाणून घ्या…

राजकीय क्षेत्रासह उद्योजकांमध्येही खळबळ (Nagar Urban Bank)

अमृत वाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केली. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रासह उद्योजकांमध्येही खळबळ उडाली आहे. 110 वर्षांची परंपरा असलेली नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या बँकेच्या घोटाळ्यात संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असलेले पंडित याच्या मागे पोलीस अनेक दिवसांपासून होते. अधीक्षक राकेश ओला यांनी पंडितला अटक करण्याचे आदेश दिले असल्याने संगमनेर शहर पोलीस त्यांचा मागोवा घेत होते. मात्र, पंडित कुठेही मिळून आला नाही.

Nagar Urban Bank

नक्की वाचा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

राहत्या घरी छापा टाकून अटक (Nagar Urban Bank)

शनिवारी (ता. 16) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंडितच्या घरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, आणि हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला. पंडित कुठेही मिळून आला नाही. मात्र, त्याच्या घरातील बेडरूममध्ये पोलिसांनी झडती घेतली असता दडून बसलेला अमित पंडित सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह व्यापारी तसेच सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here