Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेची एक रकमी परतफेड योजना सुरू; अवसायकांची घोषणा

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेची एक रकमी परतफेड योजना सुरू; अवसायकांची घोषणा

0
Nagar Urban Bank
Nagar Urban Bank

Nagar Urban Bank : नगर : रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Nagar Urban Bank) बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये ०७ जून अखेर बँकेच्या एकुण कर्जा पैकी रुपये १६ कोटी ७०लाख वसूल करण्यात आले आहेत. मात्र, थकीत कर्ज वसुलीला (Recovery) गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या (Central Govt) मार्गदर्शन नुसार एकरकमी कर्ज परतफेड योजना ५ जुन पासून सुरू करण्यात आली असल्याचे अवसायक गणेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

एक रकमी कर्ज परतफेड योजनेमुळे कर्जदार पुढे येतील

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १७२०० ठेवीदारांचे २९३ कोटी ५७ लाख रुपये भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून परत करण्यात आले. १५८५७ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पुर्तता झालेली आहे. त्यांचे ६१ कोटी ८१ लाख रुपये भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. या एक रकमी कर्ज परतफेड योजनेमुळे कर्जदार स्वतःहून मोठ्या प्रमाणात कर्ज थकबाकी भरून आपले कर्ज खाते निल करण्याच्या दृष्टीने पुढे येतील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म भरून देण्याचे आवाहन (Nagar Urban Bank)

सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्रे नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत, असे आवाहन गायकवाड यांनी केले. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here