Nagpur Accident:इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह

0
Nagpur Accident:इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
Nagpur Accident:इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह

Nagpur Accident : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur-Jabalpur National Highway) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मदतीसाठी आर्त हाक मारूनही कोणीच मदतीला न आल्याने एका हतबल पतीने अपघातात (Accident) मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह (Wife’s body) चक्क दुचाकीवर बांधून (Tied to a bike) नेला आहे. विशेष म्हणजे ही मानवतेला काळिमा फासणारी घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

नक्की वाचा : “आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीलाच पुजलेला” – धनंजय मुंडे

आता नेमकं काय घडलं ? (Nagpur Accident)

ही हृदयद्रावक घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरफाट्यावर रविवारी १० ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडलीय. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमित भुरा यादव (३५) आणि त्यांची पत्नी ग्यारसी अमित यादव हे मागील दहा वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील लोणारा, कोराडी परिसरात राहत होते. मात्र रक्षाबंधन असल्याने हे दाम्पत्य मोटारसायकलवरून लोणारा येथून मध्यप्रदेशातील करणपूरला जात होते.

अवश्य वाचा :  देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का ?;राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगेंना प्रश्न  

यावेळी मोरफाटा परिसरात मागून वेगाने आलेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला. गाडीला कात लागल्याने अमित आणि त्यांची पत्नी ग्यारसी  हद्दीवरून खाली पडले.मात्र ग्यारसी या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र आपल्या डोळ्यांसमोर पत्नीचा मृत्यू झाल्याने अमित यादव हतबल झाले. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात जोडून मदतीची याचना केली, परंतु कोणीच थांबले नाही, असं अमित यादव यांनी सांगितलं.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  (Nagpur Accident)

पाऊस कोसळत होता, महामार्गावर गाड्या येत जात होत्या. पण मृतदेह उचलायला कोणीही पुढे आलं  नाही. त्यानंतर अमितने पत्नीचा मृतदेह चक्क मोटारसायकलवर मागे बांधला आणि सुसाट वेगाने निघाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकाराची माहिती कोराडी पोलिसांना मिळाली. महामार्ग पोलिसांनी अमितचा पाठलाग करत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घाबरला असल्याने कुठेही न थांबता सुसाट निघाला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि ऐनवेळी नशिबाने साथ सोडलेल्या अमित यांची कहाणी जगासमोर आली.