Nagpur Violence:नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर 

0
Nagpur Violence:नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर 
Nagpur Violence:नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर 

Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराच्या घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान (Faheem Khan) याच्या घरावर कारवाई (Action on the house) करण्यात आली आहे.नागपूर दंगलीतील प्रमुख आरोपी फईम खान यांच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर फिरवण्यात आला आहे. फहीम खान याच्या नागपूरच्या (Nagpur Violence) टेकानाका परिसरातील घर बांधतांना त्याने काही भागात अतिक्रमण केलंय. नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.

नक्की वाचा : दिशा सालियनच्या वडिलांकडून न्यायालयात याचिका दाखल;याचिकेत नेमकं काय ?

फहीम खानच्या घरावर बुलडोझर (Nagpur Violence)

समोर आलेल्या माहितीनुसार,नागपूर महानगर पालिकेचे पथक फहीम खानच्या घरी पोहचले असून तोडकाम करण्याच्या कारवाईला  प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.दरम्यान या आधीच फहीम खानच्या परिवाराने रात्री घर रिकामे केलं आहे. तर हे घर फहिम खानच्या आईच्या नावाने असल्याची माहिती पुढे आली आहे. मनपाच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता या प्रकरणी फहीम खानच्या अडचणी आणखी वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

अवश्य वाचा : राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’राबविली जाणार;महसूल मंत्र्यांचा निर्णय

अनधिकृत बांधकाम पाडले (Nagpur Violence)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे उल्लंघन केल्याचे नमूद केले होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या घराचा कोणताही बिल्डिंग प्लॅन मंजूर झालेला नाही, त्यामुळे ते बेकायदा बांधकामाच्या श्रेणीत येते. शनिवारी नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित हिंसाचाराच्या आरोपींनी वापरलेली दोन दुकानेही सील केली होती. अशातच दोन जेसीबीच्या मदतीने नागपूरमध्ये फहीम खानच घर तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कारवाईतून  दंगेखोरांना सरकारने मेसेज दिला असल्याचेही बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here