Namdeo Dhasal Movie : कवी नामदेव ढसाळांचा झंझावत मोठ्या पडद्यावर येणार

पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या कविता, आणि संभाषणातून आरसा दाखवणारे कवी नामदेव ढसाळ यांचा अन्याय, शोषणाविरोधातील लढा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

0
Namdeo Dhasal Movie
Namdeo Dhasal Movie

नगर : पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या कविता, आणि संभाषणातून आरसा दाखवणारे कवी नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांचा अन्याय, शोषणाविरोधातील लढा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांच्या बंडखोर कवितांनी अवघे साहित्य विश्व ढवळून निघाले होते. तर, दलित पँथरने (Dalit Panthers) राज्यातील अनुसूचित जातींवरील अत्याचाराला वाचा फोडली. आता, हाच झंझावत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांच्या जयंती दिनी ‘ढसाळ’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

नक्की वाचा : ‘सिंघम ३’मधल्या अर्जुन कपूरचा व्हिलन लूक आउट  

‘द बायोस्कोप फिल्म्स’ने महान कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले आहेत. दोन वर्षांचे अत्यंत सखोल संशोधन आणि अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय पांडे करत असून वरुण राणा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

अवश्य वाचा : आर्या आंबेकरच ‘चोरू चोरून’ गाणं प्रदर्शित; गाण्याला चाहत्यांकडून पसंती

निर्माते संजय पांडे यांनी सांगितले की, ”पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. संपूर्ण देशात या दलित पॅंथरने एक राजकीय आणि सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार अंतःकरणाला भिडतील – वरुण राणा (Namdeo Dhasal Movie)   

चित्रपटांचे दिग्दर्शक वरुण राणा यांनी सांगितले आहे की, ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक जास्त शक्तिशाली, प्रक्षोभक विचार होता आणि हा विचार मला आव्हानात्मक वाटला, म्हणून तो तमाम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून माझे त्याला प्राधान्य राहील, असे चित्रपटांचे दिग्दर्शक वरुण राणा यांनी म्हटले. जातीच्या फिल्टर शिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

एक चित्रपट नसून ऐतिहासिक ‘बखरनामा’ (Namdeo Dhasal Movie)   

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि लेखिका मल्लिका अमर शेख यांनी म्हटले की, या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. हा एक चित्रपट नसून ऐतिहासिक ‘बखरनामा’ असल्याचे मल्लिका यांनी म्हटले आहे. ‘ढसाळ’ या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही पहा : आर्या आंबेकरच ‘चोरू चोरून’ गाणं प्रदर्शित; गाण्याला चाहत्यांकडून पसंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here