नगर : ‘धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही. मी त्यांच्या पाठीशी आहे’,असं ठाम मत महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri)महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केलं जात असल्याचे देखील शास्त्रींनी सांगितले. मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी भगवानगड (Bhagvangad)येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी शास्त्री बोलत होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड हे राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आलं आहे.या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव
धनंजय मुंडे यांनी घेतली महंत नामदेव शास्त्री यांची भेट (Namdev Shastri)
धनंजय मुंडे यांनी काल (ता.३०) रात्री भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. यावेळी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की, खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत. मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे चुकीची माहिती पसरवली जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो, तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे. मात्र हा विषय किती तानायचा हे ज्याने त्याने ठरवावं. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे,असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले.
अवश्य वाचा : बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण
‘संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत’ (Namdev Shastri)
समोरासमोर येऊन राजकारण करा,अशा पद्धतीने राजकारण करू नये. कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल,असं मला वाटत नाही.भविष्यात मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे,असे देखील शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत आहे,असं यावेळी नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले.