नगर : संतोष देशमुख यांना निर्दयीपणे केलेल्या मारहाणीचे फोटो (Santosh Deshmukh Murder Case) बाहेर आल्यावर काल मंगळवारी (ता.४) मंत्री धनंजय मुंडेंना(Dhananjay Munde) राजीनामा द्यावा लागला. याच धनंजय मुंडेंना क्लीन चिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची (Namdev Shastri) मानसिकता आता राजीनाम्यानंतर बदलली आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्वकल्पना नव्हती. धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर माझी भावना बदलली.भगवानगड देशमुख कुटुंबाच्या मागे आहे,असं आता नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.
नक्की वाचा : मोठी बातमी!प्रतिज्ञापत्रासाठी लागणारी ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ
नामदेव शास्त्री तेव्हा काय म्हणाले ? (Namdev Shastri)

संतोष देशमुख प्रकरणात मकोका अंतर्गत कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडचे धनंजय मुंडेंशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप होत असताना नामदेव शास्त्रींनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितलं होतं. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत, ते गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो,असं म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं होतं.
अवश्य वाचा : आदर्श शिंदे म्हणतोय ‘वढ पाचची’;आरडी चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित
नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले ?(Namdev Shastri)

नामदेव शास्त्री यावेळी म्हणाले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी जेंव्हा मी पहिलं वक्तव्य दिलं, तेव्हा मला पूर्वकल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे जो भगवानगडाला मानणारा आहे.त्यांनी मला या प्रकरणाची जाण करून दिली.त्यामुळे माझी भावना बदलली.भगवानगड कुटुंबाच्या पाठीशी आहेत. लोकांनी गैरसमज करू नये,मला जाण झालेली आहे. न्यायालयाला प्रार्थना आहे की, आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टातून न्याय मिळवून द्यावा.
३१ जानेवारी २०२५ ला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला होता. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं आहे.असंही ते म्हणाले होते. राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी भावना बदलल्याचे सांगत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं सांगत धनंजय मुंडेंमागचा वरदहस्त काढून घेतल्याचे दिसले.