Namokar Tirth : नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नाशिक (Nashik) येथील जैन समाजाच्या ‘णमोकार तीर्थक्षेत्र’ (Namokar Tirth) येथे ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा’ आयोजनासंदर्भात शिखर समितीची बैठक झाली.
अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाचे ‘श्री क्षेत्र णमोकार तीर्थ’ हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देऊन दर्जेदार कामे करण्याचे व ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. फेब्रुवारी महिन्यात ‘श्री क्षेत्र णमोकार तीर्थ’ येथे होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळ्या’साठी सुमारे 10 ते 12 लाख भाविक येणे अपेक्षित असून, भाविकांच्या सोयीसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन कामांच्या एकूण ₹36.35 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला यावेळी मंजुरी देण्यात आली.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात
पाणीपुरवठा, स्वच्छता वैद्यकीय सुविधांचा प्रामुख्याने विचार (Namokar Tirth)
हे तीर्थक्षेत्र धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे आंतरराष्ट्रीय आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते, पार्किंग, तात्पुरती निवासव्यवस्था, नौकानयन, वीजपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम यासारखी कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या विकास आराखड्यात कायमस्वरूपी कामांसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनासाठी तात्पुरत्या कामांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, सीसीटीव्ही यंत्रणा, हेलिपॅड आणि वैद्यकीय सुविधांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिखर समितीच्या माध्यमातून या कामांना मंजुरी दिली असून प्रशासनाकडून महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. राहुल आहेर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



