नगर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. प्रचारसभा आटोपून परत येत असताना भंडारा (Bhandara) शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काल (ता.९) मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नक्की वाचा : गुजरात टायटन्स समोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान
नाना पटोले थोडक्यात बचावले (Nana Patole Accident)
भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. नाना पटोले मंगळवारी आपली सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. नाना पटोले देखील यामध्ये थोडक्यात बचावलेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले होते. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अवश्य वाचा : आरबीआयचे नवीन पतधोरण जाहीर;रेपो दर स्थिर
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचे भाजपवर गंभीर आरोप (Nana Patole Accident)
या अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे.