नगर : भाजपच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना (Narayan Rane) चांगला आला आहे. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे. नारायण राणेंना भाजपने त्यांची जागा दाखवून दिली आहे. दुर्दैव एवढंच आहे की, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना राज्यसभेची जागा दिली. त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हे दिलं असते तर ते भाजपला शोभले असते, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
नक्की वाचा : मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा
अशोक चव्हाणांसोबत नारायण राणेंना काम करावे लागणार – राऊत (Vinayak Raut)
ज्या अशोक चव्हाणांना कंटाळून नारायण राणे दूर गेले. त्यांच्याच सोबत आता नारायण राणेंना काम करावे लागणार आहे. शिंदे गटाची अवस्था सुद्धा वाईट आहे. येत्या काही दिवसात शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. कोट्यावधी रुपयांचे आरोप असतात. भाजपवासी झाले की, ते धुतल्या तांदळाप्रमाणे होतात. सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगेच्या जिवाशी सरकार खेळतंय. त्यांची विचारपुस करायला देखील कोणी नाहीत. नारायण राणे जरांगेबद्दल जे बोलले ते अयोग्य आहे, असं यावेळी राऊत यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : कवी नामदेव ढसाळांचा झंझावत मोठ्या पडद्यावर येणार
भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालाय- राऊत (Vinayak Raut)
मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, जे जे भष्ट्राचारी आहेत त्यांनी भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं. त्यांना मशिनमध्ये घालायचे आणि स्वच्छ होवून यायचे हा राजकीय छंद बनलाय, असे त्यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत विनायक राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काही वेगळा निर्णय देतील, अशी अपेक्षा नाही. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आज होईल.असे त्यांनी म्हटले आहे. भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालाय, असाही टोला त्यांनी लगावला आहे.