Narcotics : पोस्टाने मागवले अंमली पदार्थ; गुन्हा दाखल, एकास अटक

Narcotics : पोस्टाने मागवले अंमली पदार्थ; गुन्हा दाखल, एकास अटक

0
Narcotics

Narcotics : श्रीरामपूर : शहरात थेट पोस्टाने हेरॉईन (अंमली पदार्थ)(Narcotics) मागवण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) याप्रकरणी कारवाई (Filed a case) करून एका जणास अटक (Arrested) केली आहे. या प्रकाराने श्रीरामपुरात अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा: सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक

एन.सी.बी. मुंबई यांच्याकडून माहिती

याबाबतची अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना अतिरिक्त संचालक, एन.सी.बी. मुंबई यांच्याकडून कळवण्यात आले होते की, पुणे येथून एक पार्सल श्रीरामपूर येथे पोस्टाने जाणार असून सदर पार्सलमध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता आहे. सदर पार्सल हे पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्याचे सांगून पार्सलचा क्रमांक पोलिसांना त्यांनी कळवला होता. ओला यांनी यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना याबाबतची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

अवश्य वाचा: सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव; केंद्र सरकारची घोषणा

पटेल हायस्कूलच्या ग्राउंडवर पोलिसांनी लावला सापळा (Narcotics)

त्यानंतर पोलिस पथकाने श्रीरामपूर येथे शहरातील नेवासा रोडवर असलेल्या पोस्टात जात पोस्ट मास्तर सागर आढाव यांची भेट घेवून पोलिसांना मिळालेल्या सदर पार्सलच्या क्रमांकाची माहिती घेतली. तेव्हा सदर क्रमांकाचे पार्सल डिलीव्हरीसाठी पाठवण्यात आल्याचे समजले. हे पार्सल विक्रांत राऊत (रा.पटेल हायस्कूल समोर, पुर्णवादनगर, वॉर्ड नं. ७) यांना देण्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर पार्सल हे महिला पोस्टवूमन स्वप्ना प्रशांत माळवे या नेऊन देण्यासाठी निघाल्या असता त्यांच्या पाठीमागे कारवाईसाठी पोलीस पथक त्यांच्या मागावरच होते. त्यानंतर सदर पार्सल ज्यांच्या घरी द्यायचे त्याच्या आजूबाजूला पटेल हायस्कूलच्या ग्राउंडवर पोलिसांनी सापळा लावला.

त्यानंतर लगेच एक इसम तेथे आला त्याने माळवे यांच्याकडून पार्सल स्विकारले व सही केली. तेव्हा पार्सल स्विकारणारा संबंधित व्यक्ती हा आरोपी असल्याची खात्री होताच पोलिसांनी लगेच त्याला पकडले. तेव्हा त्याने पोलिसांना आपले नाव विक्रांतकुमार जालिंदर राऊत (वय-२५, रा.पुर्णवादनगर) असे सांगितले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्याने स्विकारलेल्या पार्सलची तपासणी केली. तसेच या आरोपीची अंगझडती घेतली. त्याच्याकडील पार्सलवर इंग्रजीत विक्रांत राऊत (रा.पटेल हायस्कूल) असे लिहलेले होते. तसेच पार्सल पाठवणाऱ्याचे नाव दिपक दास (रा. निलाय अपार्टमेंट, फ्लॅट नं.४, पलटन बाजार, बसस्टँडजवळ) असा पत्ता लिहिलेला होता. पोलिसांनी ते पाकीट खोलले असता त्याच्यात पोलिसांना अंमली पदार्थ (हेरॉईन) मिळून आले. सुमारे १२ हजार २०० रुपये किंमतीची ही हेरॉईन पावडर पोलिसांनी जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.